कळमनुरी/ हिंगोली (Kalamanuri Murder case) : कळमनुरी तालुक्यातील मसोड शेत शिवारात स्वतःच्या शेतातील आखाड्यावर मागील पंधरा वर्षापासून राहणाऱ्या वृद्ध दांपत्याची हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार, आज मोगले दांपत्याची सून उषा गंगाराम मोगले ह्या आपल्या दोन मुलीसह आपल्या सासु सासर्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता तेथे निवृत्ती सखाराम मोगले वय (७५)व त्यांच्या पत्नी कौशल्याबाई निवृत्ती मोगले वय (७०) यांचा आखाड्यावर मृतदेह आढळून आला. यानंतर या (Kalamanuri Murder case) घटनेची माहिती त्यांच्या सुनेने गावकऱ्यांना दिली व गावकऱ्यांनी ही माहिती (Kalamanuri Police) कळमनुरी पोलिसांना दिली माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपधीक्षक एम.डी. थोरात, कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक सतीश ठेंगे, जमादार दासु राठोड, पो. कॉ. माधव ढोखळे, यांच्यासह सरपंच उत्तम कुरुडे, उपसरपंच प्रकाश गिराम, संभाजी इंगोले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Kalamanuri Hospital) कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची (Kalamanuri Murder case) उत्तरीय तपासणी सुरू होती या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया (Kalamanuri Police) कळमनुरी पोलीस ठाण्यात सुरू होती.