शेंबाळ पिंपरी येथील खून प्रकरण
कळमनुरी (Kalamanuri Suicide Case) : विदर्भातील शेंबाळ पिंपरी येथील २३ वर्षीय भावासोबत मोटार सायकल बाहेर नेण्याच्या कारणातून झालेल्या वादात २१ वर्षीय भावाने लोखंडी फावड्याने केलेल्या मारहाणीत २३ वर्षीय भावाचा मृत्यू झाला होता. (Kalamanuri Suicide Case) सदर प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात लहान भावावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पसार झालेल्या या भावाने कळमनुरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघड झाली.
आरोपी भावाने कळमनुरी शिवारात गळफास घेऊन केली आत्महत्या
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विदर्भातील खंडाळा पोलिस ठाणे हद्दितील शेंबाळ पिंपरी येथील झोपडपट्टी भागात राहणारा दिनेश जयवंत शिरफुले (२०) हा गवंडी काम करावयाचा तर त्याचा भाऊ मनिष जयवंत शिरफुुले (२३) मोटार सायकल होती. या दोन सख्ख्या भावात २८ मार्च रोजी रात्री ९. ३० च्या सुमारास मोटार सायकलच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. या (Kalamanuri Suicide Case) भांडणामध्ये मनिषने दिनेशच्या डोक्यामध्ये फावड्याने अनेक वार केल्याने दिनेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला शेंबाळ पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता पुढील उपचाराकरीता पुसदच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले होते. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृतक दिनेशची आजी गयाबाई सिताराम शिरफुले यांच्या फिर्यादीवरून मनिष शिरफुले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनिष शिरफुले हा फरार झाला होता. खंडाळा पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाकडे शोध घेऊनही त्याचा थांग पत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे लोकेशन काढले असता कळमनुरी शिवारात असल्याची माहिती मिळाली होती. कळमनुरी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर (Kalamanuri Suicide Case) कळमनुरी पोलिस त्याचा शोध घेत असताना मनिषचा मृतदेह कळमनुरी शिवारात चिंचाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे दत्त मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक मोहन भोसले, रघुनाथ भोसले, जमादार रवि इंगोले, माधव भडके, प्रशांत शिंदे, संजय राठोड, जगन पवार यांच्या पथकाने भेट दिली. त्याची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली. या (Kalamanuri Suicide Case) प्रकरणात कळमनुरी पोलिसात गणेश शिरफुले यांनी दिलेल्या माहितीवरून मनिष शिरफुले याने मोटारसायकल घेण्याच्या, मागण्याच्या नैराश्याच्या कारणातून झाडाला दोरीने गळफास घेऊन मरण पावल्याचे नमुद केल्याने आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास इंगोले हे करीत आहेत.