लातूर येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलची चौकशी करून दोषींवर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी
कळमनुरी/हिंगोली (Kalamanuri Thiya Andolan) : लातूर येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये एकात्मिक (Tribal Development) आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत मागील अनेक वर्षांपासून काही ना काही अनुसूचित प्रकार घडत आहे तसेच ३० जुलै रोजी एका विद्यार्थ्याचा या शाळेत संशयास्पद मृत्यू देखील झालेला आहे. यामुळे विद्यार्थी भयभीत झालेले आहेत तसेच या शाळेत कोणत्याही मूलभूत सुविधा नसून फक्त शासनाकडून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याने (Swami Vivekananda English School) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल लातूर या शाळेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करावी व या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दुसर्या शाळेत प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार डॉ.संतोष टारर्फे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सतिष पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली (Kalamanuri Thiya Andolan) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर येथील (Swami Vivekananda English School) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये मागील काही दिवसांपासून अनुसूचित प्रकार घडत आहे यातच ३० जुलै रोजी एका विद्यार्थ्याचा संसार मृत्यू देखील झाला यामुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भयभीत झालेले आहेत तसेच या शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध नसून फक्त शासनाकडून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप शाळेत शिकणार्या पालकांनी केला आहे. या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना दुसर्या शाळेत प्रवेश देण्यात यावा तसेच या शाळेची चौकशी करून कारवाई करावी व सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी माजी आमदार डॉ.संतोष टारर्फे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सतिष पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन (Kalamanuri Thiya Andolan) करण्यात आले. यावेळी बबन डुकरे, संतोष भीमराव भुरके,रामदास देवबाराव आम्ले, प्रल्हाद भगवान ठोंबरे, कानबाराव भरकाडे, रायजी ठोंबरे, हनुमान धनवे, दत्ता भरकाडे, राजू लोखंडे, पांडुरंग खिल्लारे, विलास बेले, सुधाकर रिठ्ठे, माधव बोचरे, सुरज आसोले, नागोराव कराळे, शहाजी दांडेगावकर, दौलत धनवे, शेकुराव मुकाडे, दत्ता आमले, महादू अंभोरे यांच्यासह शेकडो पालकांची उपस्थिती होती.