रामटेक (Kalidas University) : आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनी सायंकाळी स्थानिक (Kalidas Memorial) कवींनी कालिदास स्मारकावर काव्य वाचन करुन महाकवींना अभिवादन केले तर राञी आषाढ मेघांनी कालिदासांना जलधारा बरसवून तृप्त केले. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. नंदेश शेळके यांच्या नेतृत्वात ञिविक्रम ते नागार्जुन टेकड्यांवर बारा हजार सीडबाॅल्स टाकून महाकवींना नमन केले. (Kalidas University) कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दुपारी कालिदास स्मारकात मेघदूतचे पठन केले.
या मेघदूतातील श्लोकावरुन आषाढाचा पहिला दिवस (Kalidas University) कालिदास दिन म्हणूनपाळला जातो.शनिवार दि ६ जुलै ला सायंकाळी ५ वाजता गडमंदीर परिसरातील (Kalidas University) कालिदास स्मारक येथे विदर्भ साहित्य संघाच्या रामटेक शाखेने आषाढ कवि सम्मेलनाचे आयोजन केले होते. (Vidarbha Sahitya Sangh) वि.सा.संघ रामटेकचे अध्यक्ष माजी प्राचार्य दीपक गिरधर अध्यक्षस्थानी होते. प्रा.डाॅ. सावन धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक केले, राकेश खलासने यांनी संचालन तर वेदश्री बारोकर हिने आभार प्रदर्शन केले. मागील पंचेवीस वर्षांपासून हा उपक्रम वि.सा.संघाकडून सुरु आहे,पुढेही तो सुरु रहावा यामुळे महाकविंच्या स्मृतींना उजाळा मिळतो व नवोदित कविंना वाव मिळतो, असे प्रतिपादन दीपक गिरधर यांनी यावेळी केले. उपस्थित कविनी कालीदास दिनाला साजेशा पावसावर, स्ञी मुक्तीवर तसेच इतर प्रासंगिक विषयांवर काव्य वाचन केले.
या वेळी प्रामुख्याने प्रा. डॉ. गिरीष सपाटे, ऋषिकेश किंमतकर, प्रा. डाॅ. सावन धर्मपुरीवार, प्रा. डाॅ. रविंद्र पाणतावने, प्रा. डाॅ. जगदीश गुजरकर, शिल्पा ढोमने, माला पारधी, उमा काठिकर, प्रा. राजेंद्र बावनकुळे, राहुल शामकुवर, डॉ. गजेंद्र बरबटे, सुभाष चव्हाण, सचिन चण्हान, जाधव , दिपक रोकडे, डाॅ. अश्विनी बरभटे, वेदश्री बारोकर, आनंद बारोकर, या कविंची उपस्थिती होती.
कालिदास दिनाचे (Kalidas University) औचित्य साधून समर्थ कनिष्ठ महाविद्याय आणि सृष्टी सौंदर्य परिवाराने झाडे लावा पर्यावरण वाचवा” या शिर्षकाखाली कालिदास ट्रेक व”कालिदास सीड बाॅल ते हा उपक्रम राबविण्यात आला.संस्कृत विद्यापीठात कालिदासांवर व्याख्यान तसेच आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. रामटेक नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी व्यक्तीशः लक्ष घालून (Kalidas Memorial) कालिदास स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करवून घेतली. अमोल खंते यांनी अॅडव्हेंचर चेरी फार्म येथे कवींसाठी ‘कालिदास भोज’चे आयोजन केले होते.