अपघातात सहा महिन्याच्या मुलीसह मातेचा मृत्यू: दोन जण जखमी
कळमनुरी (Kalmanuri Accident) : शहरातील बायपास रस्त्यावर समोरून येणार्या श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन या देवदर्शनासाठी जाणार्या सहा महिन्याच्या मुलीसह मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत देवदर्शनासाठी जाणार्या भावीकावंर काळाचा घाला झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हैदराबाद येथून उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात असलेले भाविक (Kalmanuri Accident) कळमनुरी शहरातील बायपास राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनासमोर अचानक आलेल्या श्वानाला वाचविण्यासाठी वाहनाचे ब्रेक मारल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून किया कंपनीची कार क्रं. टी.एस ०७.जी.एक्स.३३८३ ही कार पलटी होऊन अपघात घडला ही घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
अपघात झाल्याचे कळताच समोरील मैदानावर क्रिकेट खेळणार्या खेळाडूंनी धावत येऊन कार सरळ करून सर्व जखमींना बाहेर काढले व या (Kalmanuri Accident) घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, जमादार दादासाहेब कांबळे, दिलीप पोले, जगन पवार,सरकटे हे घटनास्थळी पोहोचले व सर्व जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता चारुनिधी ऋषी कालावटीया (३४), रंगिरा ऋषी कालावटीया (६ महिने) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तसेच ऋषी कलावटीया व दिलीप सिंह राजरतन हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून यातील दिलीप सिंह राजरतन यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. यानंतर मयत चारूनिधी कालावटीया, रंगिरा कालावटीया या मायलेकीचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. (Kalmanuri Accident) देवदर्शनासाठी जाणारे भाविक हे ओडिसा राज्यातील कटक येथील राहणारे असून ते हैदराबाद येथील एका खासगी कंपनीमध्ये ऋषिकेश व त्यांची मयत पत्नी हे सॉफ्टवेअर इंजिनियर अभियंता म्हणून काम करीत होते. त्यांची एक सहा महिन्याची एकुलती एक मुलगी या अपघातात या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत आईसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू झालेला पाहून अनेकांचे डोळे पानावले होते.
कळमनुरी शिवारात झालेल्या कारच्या अपघातात (Kalmanuri Accident) चारूनिधी कालावटीया (३२) या मातेसह त्यांची चिमुकली रंगिरा कालावटीया यांचा मृत्यू झाला तर ऋषि कालावटीया, दिलीपसिंह राजरतन हे दोघे जखमी झाले आहेत.