आखाडा बाळापूर/हिंगोली (Kalmanuri Accident) : शेवाळा ते आखाडा बाळापूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दुचाकी कालव्यात पडून एकजण जागीच ठार झाला तर दुसर्या जखमीला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात येत असताना त्याचा वारंगाफाटा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. शेवाळा रस्त्यावर वीस तासात दोन अपघातामध्ये तिघांना जिव गमवावा लागला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी साडेतीन- चार वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर येथून दुचाकीने गणेश मारोती डोके (६५) रा.उचाडा ता.हदगाव जिल्हा नांदेड व भाउâराव श्रीराम हेगडे रा.साखरा ता.उमरखेड जि. यवतमाळ हे दोघेजण उचाडा ता.हदगावकडे जात असताना शेवाळा बाळापूर रस्त्यावरील कालवा वळणावर दुचाकी नियंत्रण सुटून दुचाकी कालव्यात पडली. अपघात समजताच शेवाळा-आखाडा बाळापूर व परीसरातील नागरिक, युवकांनी धाव घेऊन जखमी कालव्यातून बाहेर काढले. गंभीर जखमींना ऑटोने ग्रामीण रूग्णालयात नेले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव पथकाने प्राथमिक उपचार केले गंभीर जखमी असल्याने त्यास नांदेड नेत आसताना वाटेत मृत्यू झाला असल्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, राजीव जाधव, शिवाजी पवार यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, राजीव जाधव, शिवाजी पवार, अतुल मस्के, पिराजी बेले, गजानन सरकटे पोलीस पथकाने भेट दिली.शेवाळा, बाळापूर, उचाडा व इतर भागातील नागरिक युवक घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.दोन्ही मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परीवार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती.
धोकादायक वळण
शेवाळा ते बाळापूर रस्त्यावर मुख्य कालव्यावर पुल असुन धोकादायक वळण आहे. येथे यापूर्वी अनेकदा दुचाकी वाहन कालव्यात पडून अपघात झाले आहे तरी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणत्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.