कळमनुरी (Kalmanuri Accident) : शहरातील हिंगोली नांदेड रस्त्यावर शिंदे दूध डेअरी समोर वाहनासमोर दुसरे बाजूला जाण्याचे प्रयत्न करणारे दूचाकी सवारा समोरून येणारे दुचाकी स्वराची धडक (Kalmanuri Accident) होऊन एक युवक जागीच ठार झाला एक युवक गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की २७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुमारास शहरातील हिंगोली नांदेड रस्त्यावर शिंदे दूध डेरी कडून दुचाकी सवार हे समोरून येणारे एका वीट घेऊन जाणार्या वाहना समोरून एकदम रस्त्यात आल्याने नवीन बस स्थानक कोण येणारे दुचाकी सवारांना अचानक समोरून आलेले दुचाकीला (Kalmanuri Accident) जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की एम.एच.३८-एच.५९१३ या दुचाकी स्वारा युवराज प्रकाश वाढवे (१८) रा.इंदिरानगर कळमनुरी यांचा जागीच मृत्यू झाला व प्रभूद बलखंडे हे गंभीर जखमी झाला नागरिकांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जखमीवर डॉ.विठ्ठल करपे, डॉ. शेषराव नरवाडे, डॉ.आनंद मेने यांनी तात्काळ उपचार केले मयतावर शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या (Kalmanuri Accident) घटनेच्या उशिरा पर्यंत कळमनुरी पोलीस स्टेशन कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.