कळमनुरी (Kalmanuri Crime) : गेल्या अनेक दिवसांपासून माजी सरपंच व काही लोकात कुळाच्या शेतजमीनीचे वाद सुरू असताना आज (Kalmanuri Tehsil) कळमनुरी तहसील कार्यालयासमोर माजी सरपंचावर तीन जणांनी प्राण घातक हल्ला केला. पोलिसांनी व नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने त्यांचा जीव वाचला. तसेच (Kalmanuri Police) पोलिसांनी तत्परता दाखवीत या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले आहे. एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.
पोलिसांच्या व नागरिकांच्या सतर्कतेने जीव वाचला
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कुपटी येथील माजी सरपंच विजय रत्नपाल नरवाडे हे आपल्या कामासाठी कळमनुरी तहसील कार्यालयात आले. काम संपवून राष्ट्रीय महामार्गावर आले असता त्यांची काही लोकांसोबत कुळाच्या शेतजमिनीच्या वादातून बाचाबाची सुरू झाली. यानंतर काही लोकांनी याची माहिती (Kalmanuri Police) कळमनुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी कोणतीही हाय काय न करता घटनास्थळी धाव घेतली. तेथे सरपंचावर कोयत्याने प्राणघातक हल्ला सुरू केला होता.
घटनेतील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान पोलिसांनी व उपस्थित नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने कोयत्याचे वार हे माजी सरपंच विजय नरवाडे यांच्या पायावर व हातावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तात्काळ (Kalmanuri Hospital) उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले. तसेच (Kalmanuri Police) पोलिसांनी तुषार नरवाडे भीमराव नरवाडे यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. या घटनेतील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. यावेळी पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार दिलीप पोले, देविदास सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.