आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
कळमनुरी (Kalmanuri municipal council) : कळमनुरी शहरात नगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत तसेच शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागले असून नाल्या तुडुंब भरल्या आहेत. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या (Kalmanuri municipal council) नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी कळमनुरी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत नगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तसेच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास घागर मोर्चा आंदोलन करण्याचा इशाराही दिला व यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
कळमनुरी शहरातील नाईकवाडी मोहल्ला या भागात महिन्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा होत असून तो पाणीपुरवठा देखील अत्यंत कमी दाबाने होत आहे जवळपास ५० ते ६० घरांना पाणी भेटत नाही तसेच शहरातील नुरी कमान, पोस्ट ऑफिस, नुरी चौक,भाजी मंडई,आठवडी बाजार या भागात घंटागाडी फिरत नाही यामुळे शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागले आहेत नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे घाण सांडपाण्यामुळे संसर्गजन्य रोग होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
याबाबत नागरिकांनी वारंवार नगर परिषदेचे आधिकारी व कर्मचाऱ्यांना (Kalmanuri municipal council) पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी व शहरात स्वच्छता करण्यासाठी सूचना देऊनही प्रशासनाने या बाबत दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दि.१६एप्रिल रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर तब्बल एक तास ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली व यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच आठ दिवसात नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत दिल्या नाहीत तर नगरपालिका कार्यालयासमोर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अॅड.इलियास अहेमद,मो.शौकत,राजेश बोरकर, मो.आवेस नाईक,मौलाना मंजुर अहेमद,जमील खान,शेख अलताफ, रमेश बोरकर, बाळु मिटकरी, मो.जाबेर नाईक,मो.शादाब, मो.शाकेर, शेख रेहान,मो.परवेज,मो.फय्याज,मो.जुनेद,मो.यासिन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नळाला पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांचा नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास घेराव
कळमनुरी शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत यातच काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे शहरातील नाईकवाडी मोहल्ला भागात नळाला दि.१६ एप्रिल रोजी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर त्याला पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी (Kalmanuri municipal council) नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास घेराव घातला पाणीपुरवठा जोपर्यंत सुरळीत होणार नाही तोपर्यंत नगरपालिका प्रशासनाच्या आणिपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याची सुटका करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला यानंतर नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंताने घटनास्थळी भेट देऊन या भागातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिले यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी घेराव मागे घेतला यावेळी या भागातील महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
नागरिकांच्या संतप्त भूमिकेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी केली मुख्य जलशुद्धीकेंद्रांची पाहणी
कळमनुरी शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी १६ एप्रिल रोजी सकाळी नाईकवाडी मोहल्ला भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घातला होता यानंतर नगरपालिका प्रशासन जागे झाले व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषद कळमनुरी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचा दाब कमी दिसून आला असता सदर दाब कमी का येत आहे याबाबत पाणी वितरण प्रणाली कडपदेव ते शहरातील जलशुध्दीकरण पर्यंत तांत्रिक बाबीची मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांच्या मार्फत पाहणी करण्यात आली. यामध्ये कडपदेव येथील विद्युत मोटर नादुरुस्त असल्याचे दिसून आले व तसेच पाणी वितरण प्रणालीत इसापूर ते कळमनुरी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत रस्त्याचे काम चालू आहे सदर काम चालू असल्यामुळे वारंवार पाणी लिकेज दिसून आले आहेत म्हणून व्यत्यय निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रविराज दरक यांनी स्थळ पाहणी करून तात्काळ दुरुस्ती चे आदेश दिले आहे. यावेळी अभियंता अमोल मोरे,आनंद दायमा,सुभाष काळे, निळकंठ मस्के आदींची उपस्थिती होती.
हि तर मानव निर्मित पाणी टंचाई:नंदकिशोर तोष्णीवाल
नगर परिषदेच्या (Kalmanuri municipal council) पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी ही कळमनुरी ते वाकोडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी फुटत आहे नगर परिषदेने वास्तविक पाहता संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून तात्काळ दुरुस्ती करून घेणे किंवा नसता त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना काही केलेले नाही तसेच पंप पाऊस मधील तांत्रिक बिघाड असतानापण दुर्लक्ष केल्या जात आहे ज्यामुळे शहरात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर उद्भवली आहे ही निसर्ग निर्मित नसून नगरपरिषदेच्या गलथान कारभार चा फटका शहरवासीयानां बसत आहे. याच फुटलेल्या जनवाहिनीतून बाजूलाच उभे असलेले टँकर मध्ये पाणी भरल्या जात आहे ते रस्त्याच्या कामात वापरल्या जात आहे.
याचाच अर्थ सदरची जलवाहिनी फुटली की फोडली याचा शोध घेणे आवश्यक आहे.नगरपरिषदेच्याच रस्त्याचे काम चालू असताना शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटत आहे याचाच अर्थ नगरपरिषदेचे तांत्रिक कर्मचारी याबाबतीत गंभीर नाहीत कारण जलवाहिनी नेमकी कुठे आहे याची माहिती नगरपालिकेला असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नगरपरिषदेने शहरातील पाणीटंचाईवर गांभीर्याने लक्ष देणे अवश्यक असताना याबाबतीत सातत्याने दुर्लक्ष होत आहे अशी प्रतिक्रिया कळमनुरी शहर विकास मंचचे नंदकिशोर तोष्णीवाल यांनी दिली.
आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा-एडवोकेट इलियास नाई
कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करणारे ईसापुर धरणात मुबलक पाणी साठा असूनही (Kalmanuri municipal council) नगरपालिकाचे शून्य नियोजनामुळे शहराला आठ दिवस आड पाणीपुरवठा होत आहे तरी नगरपालिकांनी योग्य नियोजन करून शहराला पाणीपुरवठा सुरू करा नसता नगरपालिकावर घागर मोर्चा काढण्याच्या इशारा माजी नगरसेवक एडवोकेट इलियास नाईक यांनी दिला.