तिरुपती नगर भागात मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
कळमनुरी (Kalmanuri Municipality) : कळमनुरी शहरातील (Kalmanuri city) तिरुपती नगर भागात मुलभुत सुविधा उपलब्ध नसल्याने याभागाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या भागातील नागरिकांना रोजचा रहदारी करिता मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. नाल्या बांधण्यात याव्या, आदी मागणीसाठी मनसेच्या पदाधिकारी व तिरुपती नगर भागातील महिला व नागरिकांनी (Kalmanuri Municipality) नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात सुमारे १ तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी रविराज दरक यांना देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अवकाळी पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय
कळमनुरी शहरातील (Kalmanuri city) तिरुपती नगर भागात अनेक दिवसापासून रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले. या भागातील नागरिकांना रहदारी करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. यापूर्वी अनेकवेळा भागातील नागरिकांनी व मनसे कार्यकर्त्यांनी या भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निवेदने दिले तसेच आंदोलने ही केले. परंतु आश्वासन व्यतिरिक्त त्यांच्या पदरात काहीच न पडल्याने तिरुपती नगर भागातील संतप्त झालेल्या महिलांनी, नागरिकांनी व मनसे कार्यकर्त्यांनी आज (Kalmanuri Municipality) कळमनुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात सुमारे १ तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान मुख्याधिकारी व आंदोलनकर्त्यां मध्ये जोरदार बाचाबाची झाली.
यानंतर आंदोलन कर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकऱ्यांना देत सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष विनोद बांगर, संजय भालेराव, देविदास थोरात,काशीनाथराव बांगर,लोकेश बिर्ला,मनीष सारडा,संदीप बोंगाने,केरबा सोनुले, निलेश सोमवंशी, स्वाती विनोद बांगर,सरस्वती सारडा,स्वाती संदीप बोंगाने,नंदा सोमवंशी, सुमिया दादाराव काळे,रंजना शंकर लाखाडे, रेखा अग्रवाल, अनिता सदाशिव खुडे,रेखा संतोष भिसे,सरस्वती राजकुमार चक्कर,आश्वविनी अशोक बेले,वच्छला श्रीराम पाचपुते, अर्चना राजकुमार सुर्यवंशी, रुचिता रवी कुडमुते, रेणुका अशोक गिराम, अपर्णा मिलिंद मोरे,आश्विनी प्रसाद सवणे, शंकुतला सदाशिव थोरात,अनिता विजय बिर्ला,वनिता संजय भालेराव आदींची उपस्थिती होती.
आगामी काळात तिरुपती नगर भागात मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार: मुख्याधिकारी रविराज दरक
तिरुपती नगर भागात मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज तिरुपती नगर भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना मुख्याधिकारी (Kalmanuri Municipality) यांनी सांगितले की, सध्या आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आगामी काळात तिरुपती नगर भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनामार्फत निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करून लवकरच तिरुपती नगरभरात मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करेल.
शासनाने व सत्ताधाऱ्यांनी तिरुपती नगर वासीयांच्या तोंडाला पाणी पुसली: विनोद बांगर
तिरुपती नगर भागात काही महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी विकास कामाचे भूमिपूजन करून या भागाचा विकास करणार असल्याचे सांगितले. शासन दरबारी पाठपुरावा करीत असताना या कामाचे कार्यारंभ आदेश देखील देण्यात आल्याचे (Kalmanuri Municipality) नगरपालिका कार्यालयात सांगण्यात आले होते. मात्र आज रोजी या कामांसाठी निधीच उपलब्ध झाला नसल्याने हे काम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे यावरून शासनाने व सत्ताधाऱ्यांनी या भागातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे आगामी काळात लवकरात लवकर जर तिरुपती नगर भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर यांनी दिला आहे.