कळमनुरी/ हिंगोली (Kalmanuri Police) : कळमनुरी तालुक्यातील (Kalmanuri Taluka) मुंढळ येथे प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेक जण दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. यामुळे (Kalmanuri Police) पोलीस प्रशासनाने तात्काळ दारू बंद करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा पोलीस निरीक्षकांना मुंढळ येथील महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कळमनुरी तालुक्यातील (Kalmanuri Taluka) मुंढळ येथे मोठ्या प्रमाणात खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेक जण दिवसभर मोलमजुरी करून दारूचा नशा करीत असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. अनेक जण दारू पिऊन परिवारामध्ये भांडण करतात. या कारणाने महिलांचे संसार उध्वस्त होत आहे. यामुळे (Kalmanuri Police) प्रशासनाने तात्काळ दारू बंद करावी अन्यथा महिला ह्या आपल्या परिवारासह पोलीस ठाण्यासमोर उपोषण करतील. असा इशारा लेखी निवेदनाद्वारे (Kalmanuri Police) पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्रनाथ वाघ, महादु पोटे, गफार खान, भगवान राव मस्के, रामेश्वर वाघ, विश्वास हाके, शेख शेरू, संभाजी टाले, धुरपता सोनुळे, पदमाबाई सोनुळे, चंद्रकला पोटे, बालाबाई पोटे, गोदावरि मोरे, सुरेखा बेले, नर्मदा रोशने, सुरेखा बेले, संगीता काकडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.