कळमनुरी(Hingoli):- कळमनुरी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) तिसऱ्या दिवशी १० इच्छूक उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रांची उचल केली असुन विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी दि. २४ऑक्टोंबर रोजी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे दि.२४ ऑक्टोंबर पर्यंत ५१ संभाव्य व्यक्तींनी १२० नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी दिली.
तिसऱ्या दिवशी आमदार संतोष बांगर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ९३ कळमनुरी विधानसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दि.२४ ऑक्टोंबर पर्यंत ५१ संभाव्य व्यक्तींनी १२० नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे तसेच असुन विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी दि. २४ऑक्टोंबर रोजी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. या निवडणुकीसाठी एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे दि. २९ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची (Nomination papers) छाननी करण्यात येणार आहे. तर दि.४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याची माहिती विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली.