परभणी(Parbhani):- शहरातील शंकर नगर, रामकृष्ण नगरमध्ये झोपडपट्टी डिपीवरील विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. तसेच काही भागात थ्री फेज विद्युत पुरवठा (Power supply) नसल्याने संपुर्ण भागात थ्री फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील नागरीकांनी महावितराणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन
परभणी शहरातील महावितरणच्या झोन क्रमांक पाचमध्ये शंभर टक्के विद्युत बिल (Electricity bill) भरणारे ग्राहक आहेत. परंतु मागील अनेक दिवसांपासून झोपडपट्टी डिपीवरील शंकर नगर, रामकृष्ण नगरातील रेल्वे लाईन लगतच्या घरांमध्ये विद्युत पुरवठा पंधरा-सोळा घंटे खंडीत होत असतो. सोमवार १० जून रोजी रात्री आठ ते मंगळवार ११ जून रोजी ११ वाजेपर्यंत या भागात लाईट नव्हती. तसेच दररोज पहाटे पासून दुपारी १ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत किंवा लाईट कमी दाबाने पुरवठा केलेली असते. तसेच या भागातील विद्युत तारा (Electric wire) धोकादायक अवस्थेत लटकलेल्या असतात. या रोजच्या महावितरणच्या त्रासाला नागरीक त्रस्त झाले आहेत.
कायमस्वरुपी पर्याय काढण्यासाठी सहा ते सात खांबांवर थ्री फेज विद्युत पुरवठा
यावर कायमस्वरुपी पर्याय काढण्यासाठी सहा ते सात खांबांवर थ्री फेज विद्युत पुरवठा होत नसल्याने तेथील अत्याधुनिक उपकरणे चालत नाहीत. त्यामुळे थ्री फेज लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरीकांनी केली आहे.
निवेदनावर कृष्णा कटारे, अरुण तरफडे, किशन वाकळे, संदिप डुकरे, अक्षय शिंदे, चंद्रकांत कुलथे, पांडुरंग हिके, राम हंडे, लक्ष्मण गंडप्पा, राजेश ठाकूर महादेव कटारे, सचिन पुरी, शिवाजी चव्हाण, किशन हरकळ, शेराजाज, भागवत रेडे, संदिप बारसे, विशाल मकरंद, सुमीत जल्हारे, प्रदिप आदींच्या स्वाक्षर्या आहेत.