वाढत्या चोरी गुन्हेगारीवर अंकुश लावा,
सामा जिक कार्यकर्त्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
कन्हान (Kanhan Crime) : शहरातील पटेल नगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडुन लाखांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने (Kanhan Police) कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यांदी प्रशांत बाजीराव मसार वय ४२ रा. पिपरी-कन्हान यांचे भाऊजी अंकुश नथ्थुजी राऊत हे शितला माता मंदिर पटेल नगर, कन्हान येथे राहतात. प्रशांत यांचे भाऊजीकडे शनिवार आणि रविवारला सेवानिवृत्त कार्यक्रम होता. मंगळवार (दि.४) मार्च ला सकाळी ७ वाजता दरम्यान प्रशांत यांचे भाऊजी आपल्या संपुर्ण कुटुंबासह घरच्या दरवाज्याला आणि समोरील गेटला कुलुप लाऊन पुण्याला मुलाकडे फिरायला गेले. दुसऱ्या दिवशी बुधवार (दि.५) मार्च ला सकाळी १०.३० वाजता प्रशांत मसार यांना त्यांचा भाचा अनुराग अंकुश राऊत यांचा फोन आला व म्हटले की, माझा घरी चोरी झाली आहे. तुम्ही जाऊन बघा, तेव्हा प्रशांत यांनी त्यांचा घराकडे जाऊण पाहणी केली असता लोकांची गर्दी जमलेली होती.
प्रशांत यांनी माहितीची सहानिशा करुन घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता, (Kanhan Police) पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन घरात प्रवेश करुन पाहिले तर किचन रुममधील आलमारी उघडलेले दिसली आणि इतर सामान अस्त-व्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसुन आले. गुरुवारला पहाटे सकाळी ३ वाजता दरम्यान प्रशांत यांचे भाऊजी आपल्या कुटुंबासह घरी आले. त्यांनी घरातील सर्व सामानाची पाहणी केली असता, सोन्याची सामग्री किंमत अंदाजे ५०,००० रु, चांदीची सामग्री १३००० रु , रोक रक्कम ४०,०००, नवीन घड्याळ ५०० रु, कार्य क्रमात मिळालेले लिफाफे १०,००० रु असा एकुण १,१३,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला नाही. संपुर्ण घटना सीसीटीवी कैमरे मध्ये कैद झाली आहे.
अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा संधीचा फायदा घेत बंद दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन १,१३,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी प्रशांत मसार यांचे तक्रारी वरून आणि भाऊजी अंकुश राऊत यांचा बयाणावरुन अज्ञात आरोपी विरुद्ध (Kanhan Crime) गुन्हा दाखल करून, पुढील तपास (Kanhan Police) पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान हे करित आहे. वाढत्या चोरी, घरफोडीचे आरोपीवर कार्यवाही करून चो-यावर अंकुश लावा.
मागील काही दिवसा पासुन कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात चोरी, घरफोडीचे गुन्हे वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी, घरफोडी चे आरोपी पकडण्या विलंब होत असुन, कन्हान पोलीसाना पाहिजे तसे यश येत नसल्याने चोराचे हौसले बुलंद होऊन घरी कुणी नसल्याच्या संधीचा चोर पुरेपुर लाभ घेत, असल्याने चोरी, घरफोडीचे प्रमाण दिवसे दिवस वाढत असल्याने चोरी, घरफोडीच्या आरोपीना पकडुन या (Kanhan Crime) चोरीच्या घटनांवर तात्काळ अंकुश लाव ण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन देऊन दिवस आणि रात्री पेट्रोलिंग ग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी माजी नप उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, माजी नगरसेवक मनिष भिवगडे, माजी नगर सेविका रेखा टोहणे, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, दिनेश नानवटकर, जगदीश शेंडे सह नागरिक उपस्थित होते.