कन्हान (Kanhan Girl Suicide Case) : हनुमान नगर येथील रहिवासी नितीन प्रेम दासजी खोब्रागडे यांची मोठी मुलगी अंशिका हिने राहत्या घरी पंख्याला दुपटयाने गळयाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नितीन प्रेमदास खोब्रागडे वय ५२ वर्ष रा. हनुमान नगर कन्हान याना दोन मुलीच असुन मोठी मुलगी अंशिका नितीन खोब्रागडे वय १९ वर्ष असुन रविवार (दि.८) जुन ला सायंकाळी ५ वाजता नितीन खोब्रागडे हे कामावरून घरी येऊन थकले असल्याने हॉल मध्ये झोपले असता ७ वाजता त्यांच्या आईने उठवले तेव्हाच लहान मुलगी अक्षरा ही रडत येऊन ताई खोली मध्ये पंख्याला (Kanhan Girl Suicide Case) लटकलेली आहे. तेव्हा जाऊन पाहिले तर ती पंख्याला दुपटा गळयाला बांधुन लटकलेली दिसली. तिला आवाज दिला ती बोलली नाही. म्हणुन घरच्यानी मिळुन खाली उतरवले आणि शेजारी राहुल पाटील ला बोलावुन त्याच्या चारचाकी वाहनाने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मुत घोषित केल्याने उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे शव विच्छेदना करिता दाखल केले.
कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वडिल नितीन खोब्रागडे यांनी मोठी मुलगी अंशिका खोब्रागडे हिने सायंकाळी ५.१५ ते ७ वाजता दरम्यान घरातील खोली मधिल छताच्या पंख्याला दुपटयाच्या सहाय्याने गळयाला गळफास लावुन आत्महत्या (Kanhan Girl Suicide Case) केल्याच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीसानी मर्ग क्र. १८/२५ कलम १९४ बीएनएस अन्वये दाखल करून पुढील तपास करित आहे. सोमवार (दि.९) जुन ला सायंकाळी ४ वाजता हनुमान नगर कन्हान येथुन अंशिका खोब्रागडे हिची अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला.