कन्हान (Kanhan Mahashivratri) : भगवान शिव व माता पार्वती यांच्या पावन विवाहोत्सवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या महा शिवरात्री निमित्त कन्हान शहर व परिसर पूर्णतः शिव मय झाला. पहाटे पासुनच मंदिरांमध्ये अभिषेक, रुद्रा भिषेक, आरती व भजन-कीर्तनांचे स्वर घुमू लागले होते. रविवारची सुटी असल्याने दिवसभर भाविकांची अलोट गर्दी उसळली. दर्शनासाठी मंदिरांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसुन आले.

तिवाडे ले-आ उट पाधन रोड येथील हनुमान व गजानन मंदिर येथे (Kanhan Mahashivratri) शिव-पार्वती विवाहोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या दिवशी शिव-पार्वतींना हळद लावु न पारंपरिक हळदीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी भजन, कीर्तन, आरती, रुद्राभिषेक यानंतर ढोल-ताशां च्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हनुमा न व गजानन मंदिरातुन निघालेली ही शोभायात्रा शहरा तील प्रमुख मार्गांवरून भ्रमण करित गणेश मंदिरात दाखल झाली. आकर्षक झांकी, कलश, विविध वेश भुषा आणि ढोल-ताशांच्या निनादात संपुर्ण परिसर भक्तिमय झाला. सायंकाळी जस गायनाच्या कार्यक्रमा ने भक्तिरसाची मैफल रंगली. महिलांनी शिवभक्तीपर गीतांवर नृत्य करत वातावरण अधिकच भारावुन टाकले. सोमवार ला भव्य महाप्रसादाने शिवरात्री उत्सवाची सांगता करण्यात आली.

कांद्री येथील शंकर नगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये भजन कीर्तनासह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले परिसरातील नागरिकांचा उत्साह आणि आयोजकांची वेळेचे नियोजन शिस्तपूर्ण काम जमेची बाजू होती कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रतीक नायक,सोनु कनोजिया,निलेश कुमरे,अतुल गजभिये,डॉ जीवन बोपचे,पांडे महाराज,निखिल बागडे, अतुल रोकडे,चंद्रशेखर निवल, विशाल बावणे, मोनू गजभिये, रामा नेवरा, विष्णू भस्मे,अमोल चव्हाण,रवींद्र कोचे, तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक आणि महिलांनी विशेष सहयोग दिला भक्ती पूर्ण वातावरणात हर हर महादेव चा गजरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
तिवारी लेआउट येथील हनुमान व गजानन महाराज मंदिरातही महिलांनी पुढाकार घेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. नीतु ऑडियर, राणी नाग पुरे, प्रांजली नागपुरे, अंजु जाधव, कांचन महिंद्रकर, सुनंदा वानखेडे, ज्योती फाये, चंदा संकला, पूनम गुरफडे, दीक्षा ठाकरे, स्वाती महाले, प्रीती राठी, अपर्णा मिश्रा, किर्ती नांदुरकर, दर्शना तिडके, प्राची वंजारी तसेच समस्त शिव परिवाराच्या वतीने कार्यक्रम यशस्वि करण्यात आला.
जुना पोलीस स्टेशन, गांधी चौक येथील पुरातन मंदिरात महादेवाच्या पिंडीची आकर्षक सजावट कर ण्यात आली होती. पहाटे अभिषेकानंतर मंदिर दर्शना साठी खुले करण्यात आले. भाविकांनी दूध, दही, मध, बेलपत्र अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली. काली मंदिरातही सकाळपासुन भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

कन्हान-पिंपरी शिवमंदिरात लघुरुद्र, अभिषेक व आरतीनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. (Kanhan Mahashivratri) स्फूर्ती चौकातील शिवमंदिरात दिवस भर फराळाचे वाटप करण्यात आले. शिवनगर येथील महादेव मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात पूजासाहित्याचे स्टॉल्स सजले होते. बेलपत्र, रुईची पांढरी फुले व इतर पूजासाहित्याची खरेदी करित भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
एकुणच, अभिषेक, भजन, कीर्तन, शोभायात्रा आणि फराळ वाटपाच्या तसेच महाप्रसादाच्या माध्य मातुन कन्हान शहरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. “हर हर महादेव ”च्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शहर खऱ्या अर्थाने शिवमय झाले.




