कन्हान (kanhan Tiger Death) : नगरपरिषद अंतर्गत कन्हान नदी काठालगत सिहोरा गावालगत वाघाने धुमाकुळ घातला होता. या गावातील तीन गाई ठार करून, तीन गौ वंशाला जख्मी करणारा वाघ मृत अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. धरेवाडी परिसरातील नागपुर बॉयपास राष्ट्रीय चारपदरी महामार्गापासुन ८० मिटर अंतरावर तारसा रोडवरील हटवार यांच्या घरामागे रेल्वे लाईनकडे असलेल्या धान, कापुस व तुरीच्या शेतात आज वाघ मृत (Tiger Death) अवस्थेत आढळल्याची माहीती वन विभागाला देण्यात आली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेत मालकाने शेतात किटनाशक फवारणी केली होती. त्या शेतात वाघ लपुन बसुन असल्याने, त्या वाघाला फवारणीच्या औषधीची बाधा होऊन, त्याचा (Tiger Death) मूत्यु झाला असेल, अशी प्राथमिक चर्चा होत आहे.