Parbhani :- परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खादगाव रविवार 18 मे रोजी मध्यरात्री विज कोसळल्याने नुकसान झालेल्या पिडीत कुटुंबाची भेट घेत बी.के.बी.सी.च्या कांकरिया ट्रस्टने त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देत अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी माणुसकीचे कार्य करत गरजेला जो धावून जातो तोच खरा माणूस असतो या तत्त्वाला अनुसरून एक आदर्श उभा केला आहे.
घरासह घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य कपडे, धान्य आदी जळून खाक झाले
मौजे खादगाव येथील शिवारात राहणाऱ्या गंगाधर नामदेव फड यांच्या शेतातील घरावर 18 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता आकाशातून वीज कोसळली. त्या रात्री कुटुंब शेजारील घरी स्थलांतरित झालेले असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांच्या घरासह घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य कपडे, धान्य आदी जळून खाक झाले. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच कांकरिया ट्रस्टच्या सचिव सौ. मंजूताई दर्डा यांनी संवेदना व्यक्त करत “संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी” या भावनेतून मदतीसाठी पुढाकार घेत सोमवार 19 मे रोजी पिडित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला. कांकरिया ट्रस्टने दिलेल्या मदतीत दैनंदिन वापरासाठी लागणारी आवश्यक भांडी, कपडे, महिलांसाठी साड्या, मुलांसाठी कपडे व एक महिना पुरेल इतके धान्याचे पिठ, तांदूळ, साखर, खाद्यतेल, तूर डाळ, मूग डाळ, बेसन, मीठ, चहा पावडर, विविध मसाले, बिस्किटांचा समावेश असलेली जीवनावश्यक अन्नधान्याची (food grains) कीट देण्यात आली.