कारंजा(Karanja):- लग्न समारंभासाठी (wedding ceremony) गेलेल्या एका 67 वर्षीय व्यक्तीला माकडाने (Monkey)चावा घेऊन जखमी केले. ही घटना सोमवारी 6 एप्रिल रोजी सकाळी साडे 8 वाजता च्या दरम्यान दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील संत मुंगसाजी महाराज मंदिर परिसरात घडली.
दारव्हा तालुक्यातील घटना; कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार
शंकर राठोड असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते मुर्तीजापुर तालुक्यातील दहातोंडा येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार दहातोंडा येथील वऱ्हाडी धामणगाव देव येथे लग्नासाठी (married) गेले असताना शंकर राठोड नामक व्यक्तीला माकडाने चावा घेतला त्यामुळे ते जखमी(wounded) झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospitals) दाखल करण्यात आले परंतु येथे उपचाराची सोय नसल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती (Amravati)येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. मात्र माकडाने या व्यक्तीवर हल्ला का केला याचे कारण कळू शकले नाही.