कारंजा (Karanja):- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक (hit hard) दिल्याने एक ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना २ मे रोजी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन १८१ वर घडली.
ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकची कंटेनरला धडक
प्राप्त माहितीनुसार, एचआर ५५ एडी ३३०९ क्रमांकाचा कंटेनर(container) रस्त्याच्या कडेला उभा होता व त्यातील चालक व क्लिनर कंटेनरच्या मागील बाजूने उभे होते. अशात जालना येथून उडीसा जात असताना एमएच १८ बिजी ७७९७ क्रमांकाच्या ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने या ट्रकने दोघांसह कंटेनरला जोरदार धडक दिली. या घटनेत कंटेनरचा चालक भारत यादव (२५) ठार झाला तर क्लिनर सत्येंद्र प्रसाद (२०) व दुसऱ्या ट्रकचा चालक प्रदीप मिश्रा (३५, रा. रिवा मध्यप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी तर शफीक पठाण (३५, रा. नागझरी ता.अंबड जि.जालना) हे किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत.
ट्रकमध्ये अडकलेल्या मृतकास तथा जखमींना बाहेर काढले
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील(Samruddhi Mahamarga) संपूर्ण यंत्रणा, अग्निशमन दल(fire brigade), गुरूमंदिर रुग्णवाहिकेचे (Ambulances) रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य राबवले. त्याअंतर्गत ट्रकमध्ये अडकलेल्या मृतकास तथा जखमींना बाहेर काढले आणि सर्वांना उपचारार्थ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.