अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
कारंजा/वाशिम (Karanja Accident) : गेल्या महिनाभरात कारंजा तालुक्यात 22 अपघाताच्या घटना घडल्या . यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण गंभीररित्या जखमी झाले. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने अपघाताचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 21 जुलै ते 24 ऑगस्ट या दरम्यान कारंजा तालुक्यात 22 ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे (Karanja Accident) अपघात झाले. नागपूर संभाजीनगर दृतगती महामार्ग, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग यासह इतर रस्त्यावर या अपघाताच्या घटना घडल्या. 21 जुलैला कारंजा दारव्हा मार्गावरील दारव्हा वेश जवळ अपघाताची घटना घडली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. 24 जुलै ला रात्री 9 वाजता कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटात आपघात झाल्याने दोन युवक गंभीररित्या जखमी झाले.
3 जणांनी गमावला जीव तर 38 जण जखमी
25 जुलैला रात्री साडे 9 वाजता कारंजा पिंजर मार्गावरील शिवनगर या गावाजवळ दुचाकीचा अपघात (Karanja Accident) झाल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. 30 जुलैला रात्री 12 वाजता दोनद फाट्यावर अपघात झाल्याने एक जण गंभीररित्या जखमी झाला. 1 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता धाबेकर महाविद्यालय जवळ घडलेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कारंजा मुर्तीजापुर मार्गावरील वाल्हई फाट्याजवळ झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. 8 ऑगस्टला दुपारी 5 वाजता व रात्री साडे 9 वाजता कारंजा मानोरा मार्गावरील विद्यारंभ शाळेजवळ आणि शेवटी फाटा येथे अपघाताच्या दोन घटना घडल्या. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले.
9 ऑगस्ट रोजी समृध्दी महामार्गावर झालेल्या कार अपघातात (Karanja Accident) एक जण गंभीर जखमी झाला.10 ऑगस्ट रोजी सुद्धा समृद्धी महामार्गावर कार अपघात घडला आणि यात पुन्हा एक जण गंभीर जखमी झाला.12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दारव्हा वेश जवळ ऑटो अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले.13 ऑगस्ट रोजी सोहळ अभयारण्य जवळ झालेल्या दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. 14 ऑगस्ट रोजी कारंजा शहरालगतच्या विद्याभारती कॉलनी जवळ व जीवन प्राधिकरण कार्यालयाजवळ अपघाताच्या दोन घटना घडल्या. या दोन अपघातात एका जणाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.15 ऑगस्ट रोजी सुद्धा अपघाताच्या दोन घटना घडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले.
हे दोन्ही अपघात समृद्धी महामार्गावर घडले.16 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता पुन्हा समृद्धी महामार्गावर कार अपघात घडला यात एक जण गंभीररित्या जखमी झाला.17 ऑगस्ट रोजी सोमठाणा फाट्या जवळील गोलाई जवळ झालेल्या प्रवासी ऑटो अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले.19 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता कारंजा बायपास परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात (Karanja Accident) एक जण गंभीर जखमी झाला.20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कारंजा मानोरा मार्गावर झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.22 ऑगस्ट रोजी 8 वाजता कारंजा शेलुबाजार मार्गावरील शेवटी फाटा येथे झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
दिवसेंदिवस अपघाताच्या घटनात (Karanja Accident) वाढ होत असल्याने काहीना जीव गमवावा लागत आहे .तर काहींना अपंगत्व येत आहे . त्यामुळे स्वाभाविकच घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो शिवाय चरितार्थाचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.