मृतक राजस्थानमधील रहिवासी
कारंजा/वाशिम (Karanja Accident) : रक्षाबंधनासाठी गावी जाणाऱ्या एका भावाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना कारंजा-मुर्तिजापूर मार्गावरील विद्याभारती कॉलनी जवळ 14 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. राजवीर रामनिवास जांगिड वय 35 वर्ष असे मृतकाचे नाव असून, तो रा.पिचंदा ता.चिडावा जि. झुंझूनु राजस्थान येथील रहिवासी होता.
माहितीनुसार, तो कवठळ येथे कामासाठी आला होता आणि बुधवारी तो गावी जाण्यासाठी कारंजा येथून मुर्तीजापुरकडे दुचाकीने जात असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला व त्या वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. (Karanja Accident) घटनेनंतर रुग्णवाहिका चालक अजय घोडेस्वार यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.परंतु तपासणी दरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Karanja Police) शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.