कारंजा/वाशिम (Karanja Accident) : टायर फुटल्यामुळे उभ्या असलेल्या बोलेरो पिकपला मागून दुसरा पिकप धडकल्याने घडलेल्या अपघातात (Karanja Accident) एका जणाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता कारंजा अमरावती मार्गावरील धोतरा फाट्यावर घडली.
सूत्रांच्या माहितीनुसार टोमॅटो घेऊन जाणारा बोलेरो पिकप समोरील उभ्या असलेल्या पिकपला मागून धडकल्याने हा (Karanja Accident) अपघात घडला. घटनेनंतर काही जणांनी 112 वर कॉल करून मदत मागितली. त्यामुळे काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. उपचारासाठी जात असताना जखमीतील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघातातील जखमी व्यक्ती उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आल्याने जखमींची नावे कळू शकली नाही. ही (Karanja Accident) धडक एवढी भीषण होती की यातील मागील पिकपमधील चालक केबिनमध्ये अडकला. रस्त्यावरील प्रवाशांनी एकत्र येऊन त्याला बाहेर काढले आणि त्यानंतर उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले.