कारंजा/वाशिम (Karanja Accident) : ट्रकवर ताडपत्री बांधत असताना पाय घसरून खाली पडल्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही (Karanja Accident) घटना रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. भटू एकनाथ सूर्यवंशी वय ५५ वर्ष असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते धुळे येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माहितीनुसार, सिमेंटचा ट्रक घेऊन ते यवतमाळवरून कारंजाकडे येत असताना नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील धानोरा ताथोड या गावाजवळ अचानकपणे पावसाळी वातावरण तयार झाले. त्यामुळे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी ते वर चढले (Karanja Accident) आणि पाय घसरल्याने खाली पडले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णवाहिका चालक अमोल गोडवे यांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Karanja Hospital) दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शहर पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, घटनेचा अधिक तपास (Karanja Police) ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.