अनई फाट्याजवळची घटना
कारंजा/वाशिम (Karanja Accident) : ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास नागपूर- संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील अनई फाट्याजवळील चौकात घडली. या (Karanja Accident) घटनेत चार जण जखमी झाले असून, यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. प्राप्त माहितीनुसार, एमएच ०८ व्ही १४८० क्रमांकाचा प्रवासी ऑटो कारंजा येथून दोनद बू. येथे जात होता. मार्गात एका भरधाव ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या घटनेत ऑटो पलटी झाल्याने त्याखाली दबून संतोष नथुजी घुगे (२७ रा. दोनद ), शे. समीर शे.लाल (२१) व प्राजक्ता नितीन गायधनी ( २१ दोघेही रा. वाढोना रामनाथ ता. नांदगाव खंडेश्वर) व ऑटो चालक निलेश इंगोले जखमी झाले. धडक दिल्यानंतर चालक ट्रकसह फरार झाला. दरम्यान, (Karanja Accident) घटनेची माहिती मिळताच जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अनिकेत भेलांडे यांनी घटनास्थळी जावून जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. याठिकाणी जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले असून, घटनेतील गंभीर जखमी संतोष घुगे यांना पुढील उपचारासाठी अमरावती रेफर करण्यात आले आहे.