कारंजा (Karanja Bus) : कारंजा बस (Karanja Bus) स्थानकातून अकोला, अमरावती, यवतमाळ व वाशिम अशा चार जिल्ह्यात ये-जा करता येत असल्याने बसस्थानक परिसरात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. नेमका याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसराला (pickpocket) पॉकेटमारांनी आपला अड्डा बनवला आहे. मागील आठ दिवसात कारंजा बसस्थानक परिसरात पॉकेटमारीच्या दोन घटना घडल्या. यात चोरट्यांनी २६ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केली. बस स्थानक परिसरात पोलीस चौकी आहे. परंतु त्या (Karanja Police) पोलीस चौकीत पोलीस कार्यरत राहत नसल्याने पॉकेटमारांचे चांगभले होत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशातून या निमित्ताने उमटत आहेत.
१० मे रोजी इंझोरी येथील नरेश असावा हे गृहस्थ जिंतूर अमरावती या बसने अमरावती येथे जाण्याकरिता बसमध्ये चढले असता (pickpocket) पॉकेटमारांनी संधी साधून त्यांचा खिसा कापला. यावेळी आसावा यांचे १८०० रुपये रोख, इलेक्ट्रिक बिल व काही कागदपत्रे पॉकेटमारांनी लंपास केले. तर १३ मे रोजी मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील ७४ वर्षीय गृहस्थ ह. भ. प. पांडुरंग श्रीराम उपाध्ये हे कारंजा (Bus Station) बस स्थानकातून मानोरा येथे जाण्याकरिता कारंजा मानोरा या बसमध्ये चढले असता त्यांच्या पिशवीतील २५ हजार रुपये रोख रकमेवर पॉकेटमारांनी डल्ला मारला.
त्यामुळे तीन दिवसात कारंजा बस स्थानक परिसरात दोन पॉकेटमारीच्या घटना घडल्या आणि यातून २६ हजार ८०० रुपयांची रोकड पॉकेटमारांनी लंपास केली. त्यामुळे कारंजा (Bus Station) बस स्थानक परिसर हा पॉकेटमारांचा अड्डा बनला की काय ? अशी भीती प्रवाशातून व्यक्त केली जात असून, बस स्थानक परिसरात असलेल्या (Karanja Police) पोलीस चौकीत पोलिसांची कायम नेमणूक करून प्रवाशांची ही भीती दूर करावी अशी मागणी प्रवाशातून केली जात आहे