कारंजा (karanja Crime): जुन्या वादातून पती – पत्नीस बेदम मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी (karanja Crime) देण्यात आली. ही घटना ११ मे रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील कार्ली येथे घडली. या (Karanja Police) प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्ली येथील घटना
कारंजा ग्रामीण पोलिसांनी (Karanja Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादीत जुने वाद आहेत. या वादातून आरोपींनी घरात घुसून फिर्यादी भाग्यश्री विद्याभूषन वासे (२१, रा. कार्ली) व तिचा पती विद्याभूषन प्रभुदास वासे यांना लाकडी खुर्ची, थापडाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी (Karanja Police) पोलिसांनी रेखा पद्माकर वानखडे (४५, रा.बोरगाव जि.अमरावती), संगीता निळू निमगडे (२३, रा. मोखड), शारदा विष्णू सुतार (३०, रा.गुजरात) व मोहन भानुदास वासे (रा. कार्ली) यांच्या विरुद्ध कलम ४५२, ३२३, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.