वाई येथील धक्कादायक घटना
कारंजा/वाशिम (Karanja Crime) : तालुक्यातील वाई (कारंजा) येथील एका ४० वर्षीय बचत गटाच्या महिला सदस्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करून (Karanja Crime) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता घडली.
कारंजा ग्रामीण पोलीस (Karanja Police) स्टेशनमधील नोंदीनुसार , फिर्यादी महिला ही एका महिला बचत गटाची सदस्य असून, आरोपीने तिला ‘ माझ्या आईला माझ्या विरुद्धच का भडकवते ? ‘ असे बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तिला तिच्या कामावरून चिडवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी देवचंद पांडूरंग खाडे (४४, रा. वाई) याच्याविरुद्ध कलम २९६, ३५१(२) (३) भारतीय न्याय संहितेनुसार (Karanja Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.