कारंजा/वाशिम (Karanja Crime) : कारंजा एस. टी.बसस्थानकावरील (Karanja Bus Stand) चोरीचे सत्र सुरूच असून, पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधून ५२,५०० रुपये लंपास केले आहे. त्यामुळे चोरांवर (Karanja Police) पोलिसांचा वचक राहिला की नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, एक वयोवृद्ध महिला २९ मे रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास आपल्या स्थानिक रहिवासी ३८ वर्षीय मुलीसह हिंगोली येथे जाण्यासाठी स्थानिक एस. टी. बसस्थानकावर पोहचल्या होत्या.
यावेळी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले रोख ५२ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही बाब त्यांच्या लगेच लक्षात आली पण, त्यांना यादिवशी हिंगोलीला जाणे अत्यावश्यक होते. त्यामुळे (Karanja Police) पोलिसात तक्रार न करता त्या निघून गेल्या व ३१ मे रोजी परत आल्या. त्यानंतर पीडित महिलेची मुलगी निवेदिता विक्रांत काळे (रा.कल्पतरू अपार्टमेंट चंदनवाडी ) यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Karanja Crime) घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ मयुरेश तिवारी करीत आहेत.