कारंजा/वाशिम (Karanja Crime) : स्थानिक जुने एस.टी. बसस्थानक परिसरातील रहिवासी २७ वर्षीय विवाहित महिलेच्या आत्महत्याप्रकरणी (Karanja Crime) तिच्या पतीला सोमवार, ५ ऑगस्टपर्यंत पोलीस (Karanja City Police) कोठडी सुनावण्यात आली आहे.
विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिचे वडील प्रकाश विठ्ठल कळसाईत (५२, रा.अमरावती) यांनी २ ऑगस्ट रोजी येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत त्यांनी आरोपी हा मुलगी निकिता धीरज नवघण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार त्रास देत होता. या त्रासापोटी तिने गळफास घेवून आत्महत्या केली, असा उल्लेख करून तिच्या मृत्यूस आरोपी हाच जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार (Karanja City Police) पोलिसांनी आरोपी धीरज विजय नवघण (३२) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.