कारंजा/वाशिम (Karanja Crime) : मागील काही दिवसांपासून कारंजा तालुक्यातील (Karanja Crime) ग्रामीण भागात एका निळ्या रंगाच्या कारमधून देशी विदेशी दारूची अवैद्य वाहतूक केली जात होती. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे (Karanja Police) ग्रामीण पोलिसांनी 26 जून रोजी सकाळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मोखड फाटा येथे एम. एच. 14 बी.सी. 5128 क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या कारची तपासणी केली असता, त्यात 69 हजाराच्या देशी विदेशी दारूचे बॉक्स व 90 हजार रुपये किमतीची कार असा एकूण 1 लाख 59 हजारचा मुद्देमाल जप्त केला आणि चालकाला ताब्यात घेतले.
कारचालक पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोखड फाट्यावर सापळा रचून संशयीत असलेल्या निळ्या रंगाच्या कारची झडती घेतली असता, त्यात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सदर दारू साठ्यासह चालकाला ताब्यात घेतले. ही कारवाई (Karanja Police) जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी केली. (Karanja Crime) दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.