कारंजा/ वाशिम (Karanja Crime) : शेतकऱ्याने शेतीच्या कामासाठी बँकेतून काढलेले १ लाख रुपये (Karanja Crime) चोरट्यांनी पिशवीसह लंपास केले. ही घटना २५ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक सराफ लाईनमध्ये घडली. माहितीनुसार, तालुक्यातील आखतवाडा येथील निलेश महादेव मुंगुल ( ४० ) यांचे स्थानिक कॅनरा बँकेच्या शाखेत खाते असून, त्यांनी पेरणी, बी-बियाणे व अन्य शेत कामासाठी बँकेतून १ लाख रुपये काढले व एका पिशवीत ठेवले. दरम्यान, त्यांची आई सराफ लाईनमधील डॉ. संजय कीटे यांच्या खाजगी दवाखाण्यात तपासणीसाठी आली होती. त्यामुळे ते पैशाची पिशवी घेवून तेथे पोहचले.
कारंजाच्या सराफ लाईनमधील घटना
मात्र, याठिकाणी त्यांच्यावर अगोदरच पाळत ठेवून असलेल्या दोन (Karanja Crime) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शर्टवर पाठीमागून टोमॅटो केचप फेकले. त्यामुळे शर्ट पुसण्यासाठी त्यांनी हातातील पैशाची पिशवी खाली ठेवली. चोरट्यांनी ही संधी साधून पैशाची पिशवी तेथून अलगद लंपास केली. या पिशवीत रोख एक लाख रुपये होते. दरम्यान, ठेवलेल्या जागेवर पिशवी आढळून न आल्याने पैसे चोरी गेल्याचे मुंगुल यांच्या निदर्शनास आले.
पाठलाग करून चोरट्यांनी साधला डाव
घटनेची माहिती मिळताच (Karanja Police) कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळ येथील व कॅनरा बँकेत जावून सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये दोन चोरटे आपदग्रस्त व्यक्तीचा दुचाकीने कॅनरा बँकेपासून पाठलाग करत होते, असे दिसून आले आहे. (Karanja Crime) शेतकऱ्याला बरोबर फसवून त्यांनी आपला डाव साधला अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या घटनेचा तपास गुन्हे उकल शाखा करीत आहे. घटनेची पोलिसात नोंद घेण्यात आली नव्हती.