कारंजा (Karanja Crime) : कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत (Karanja Police) असलेल्या यावर्डी येथील एका राहत्या घरी वाशिम (Crime Branch) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून झाडाझडती घेतली असता, ज्वलनशील तोटे आढळून आले. सदर प्रकरणी दाखल फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध ज्वलनशील पदार्थ अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 18 मे रोजी रात्री करण्यात आली.
7151 रुपयांचा मुद्देमाल जप्त
शनिवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे (Crime Branch) वाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यावर्डी येथील सुनील रघुनाथ बोनके यांच्या घरी छापा मारून घराची झाडाझडती घेतली असता, दोन नायलॉनचे पोते आढळून आले. यातील एका पोत्यात सुपर पावर 90 कंपनीच्या प्रत्येकी 125 ग्रामचे प्रती नग 17 रुपये प्रमाणे 5155 रुपये किमतीचे 300 नग ज्वलनशील तोटे व दुसऱ्या पोत्यात अंदाजे 100 फुटाचे दोन फिकट हिरवट रंगाचे वायर एकूण किंमत 1 हजार रुपये व 1 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक कंडेन्सर पार्ट जोडलेली लालसर रंगाचा लाकडी बॉक्स असा एकूण 7 हजार 151 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाशिम गुन्हे शाखेची कारवाई
या संदर्भात (Crime Branch) गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत बाबुराव खंदारे यांचे फिर्यादीवरून आरोपी सुनील रघुनाथ बोनके यांचे विरुद्ध भा.द.वि.च्या कलम 285 , 286 व सहकलम 4-5 ज्वलनशील पदार्थ अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Crime Branch) गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे आणि त्यांच्या चमूकडून मनुष्याच्या जिवित्वास व मालमत्तेस हानी पोहोचेल अशा स्थितीत ज्वलनशील पदार्थाची अवैध साठवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली. (Karanja Crime) घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात विनोद राठोड करीत आहेत.