कारंजा तहसील कार्यालयाची कारवाई
कारंजा/ वाशिम (Karanja Crime) : येथील (Karanja Tehsildar) तहसील कार्यालयाच्या महसुल पथकाने गौणखनिजाची (Minor minerals) अवैधपणे वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडून ताब्यात घेतले. २४ जून रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, कारंजा ते मूर्तिजापूर रस्त्याचे बांधकाम आरआरएसएम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे. या (RRSM INFRA Company) कंपनीला खानापूर येथील शेततळ्याच्या कामातून निघणारा मुरूम व माती रस्त्याच्या कामासाठी वापरण्याचा प्रशासनाकडून परवाना देण्यात आला आहे. त्यानुसार दिवसा गौणखनिजाचे उत्खनन करण्यात यावे, अशी कंपनीला अट टाकण्यात आली आहे. असे असतानाही कंपनीकडून रात्रीच्या वेळी गौणखनिजाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती, (Karanja Tehsildar) कारंजा तहसीलच्या महसूल पथकाला मिळाली होती.
गौणखनिजाची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले
त्यानुसार (Revenue Team) पथकातील कर्मचारी प्रत्यक्ष पाहणीसाठी खानापूर येथील खदाणीवर पोहचले असता, त्यांना आरजे १४ जीएन २४१३ व आरएस ०७ जीडी ७४३९ हे दोन टीप्पर रात्रीच्या वेळी काळी माती व मुरुमाची अवैध वाहतूक करताना आढळून आले. महसूल पथकाने दोन्ही टिप्पर ताब्यात घेवून ते (Karanja Tehsildar) तहसील कार्यालय परिसरात उभे करण्यात आले आहेत. या दोन्हीही वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी निलेश गुगळे, तलाठी शैलेश घोगरे, आर.एस.कोकाटे, व्ही. डी.नागलकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.