कारंजा/ वाशिम (karanja Crime) : बकरी ईदची पिकनिक म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पिंप्री फॉरेस्ट अडाण जलाशयावर गेलेल्या (karanja Crime) कारंजा शहरातील तीन तरुणांचा अडाण जलाशय पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना 17 जूनच्या सायंकाळी साडे 5 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (karanja Crime) कारंजा शहरातील मुस्लिम समाजातील काही तरुण जवळच्या पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण जलाशयावर ईद-उल-अजहाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास गेले असता, काहींना धरणाच्या गेटसमोरील पात्रातील डोहात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पोहत असतांना तीन जणांचा या डोहात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्यांना गावकऱ्यांच्या सहकार्याने सोबतच्या मित्रांनी डोहातून बाहेर काढले.
मृतामध्ये रेहान खान हफीज़ खान वय १९ रा. भारतीपुरा कारंजा, साईम करीम शेख़ वय १७, रा. भारतीपुरा कारंजा, इस्पान अली, अर्षद अली वय १५, रा. भारतीपुरा यांचा समावेश असल्याचे गुरू मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी कळविले आहे. या तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात (Karanja Hospital) उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण असतांना तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी सुध्दा या डोहात दहा बारा तरुणांचा जीव गेला आहे. धरण प्रशासनाने या डोहात पोहण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे मत, या (karanja Crime) घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.