कारंजा/वाशिम (Karanja Crime) : एका 30 वर्षीय युवकाने आत्महत्या (Youth suicide) केल्याची घटना कारंजा शहरातील माळीपुरा भागात 30 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सिद्धांत महादेवराव जुंबळे वय 30 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून ,तो पाणी वाटपाचा व्यवसाय करीत होता आणि (Karanja Police) कारंजा शहरातील माळीपुरा भागात राहत होता .
प्राप्त माहितीनुसार राहत्या घरी गळफास (Youth suicide) घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर 31 मे रोजी शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले . आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान, सदर प्रकरणी (Karanja Police) शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, घटनेचा अधिक तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे.