कारंजा (Karanja hoardings) : जाहिरातीचे होर्डिंग (Advertising hoardings) कोसळून १४ जण ठार झाल्याची घटना मुंबई येथे नुकतीच घडली. मुंबई घटनेच्या धर्तीवर आता कारंजा शहरात (Karanja taluka) महाकाय होर्डिंग उभारले जात आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई सारख्या घटनांची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात वर्दळीच्या जागी महाकाय होर्डिंग
व्यवसाय वाढीसाठी जाहिरातीचा फंडा अवलंबविला जातो. त्यासाठी मोठे-मोठे होर्डिंग उभे केले जावून त्याद्वारे उत्पादनाची अथवा अन्य जाहिरात केली जाते. त्यासाठी मोठ्या शहरात वर्दळीच्या जागी महाकाय होर्डिंग उभारले जातात. जाहिरातीचा हा फंडा आता कारंजा शहरातही सुरू झाला आहे.
दुर्दैवाने एखादे होर्डिंग कोसळले तर…
त्याकरिता स्थानिक बायपास, टी – पॉइंट चौक, बस स्थानक व अन्य ठिकाणी दुकान, घरावर जाहिरात एजन्सीकडून महाकाय लोखंडी होर्डिंग (Advertising hoardings) उभारण्यात आले आहे. त्यावर विविध कार्पोरेट कंपनी आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे सर्व होर्डिंग वर्दळीच्या व उंच ठिकाणी लावले जात आहेत. दुर्दैवाने एखादे वेळेस असे होर्डिंग कोसळले तर, मुंबई सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.