तीन महिलांचा समावेश
कारंजा/ वाशिम (Karanja Hospital) : जीवनात संघर्ष करीत असताना आलेल्या नैराश्यातून अनेकजण नैसर्गिक मृत्यूआधी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न कारंजा तालुक्यातील 5 जणांनी गेल्या 3 दिवसात केला. 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान या 5 जणांनी विषारी द्रव्य प्राशन (Ingestion of toxins) करून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt) केला. यात तीन महिलांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील वाघोळा, जांब , शेलूवाडा, विरगव्हाण व मोखड आदी गावात या घटना घडल्या आहेत. 3 ऑगस्ट रोजी दुपारी साडे 4 वाजता वाघोडा येथील 46 वर्षीय महिलेने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले तर 5 ऑगस्ट रोजी दुपारी साडे 12 वाजता जांब येथील 25 वर्षीय युवकाने देखील उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्याच दिवशी सायंकाळी साडे 6 वाजता शेलुवाडा येथील 22 वर्षीय तरुनाने व विरगव्हाण येथील 38 वर्षीय महिलेने विष प्राशन केले. तर 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडे 5 वाजताचे दरम्यान मोखड येथील एका 45 वर्षीय महिलेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी उपरोक्त सर्वांना (Karanja Hospital) उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काहींना उपचाराानंतर घरी सोडण्यात आले. तर काहिवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून कारंजा तालुक्यात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून जीवन संपविण्यासाठी (Suicide attempt) विष प्राशनाचा सहारा घेतल्याचे या घटनांवरून दिसून येते.
मानसिक समुपदेशनाची गरज
मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात आत्महत्येचे प्रमाण वाढले असून या वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी (Suicide attempt) आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आत्महत्या करणाऱ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबिर आयोजित करून मानसिक समुपदेशन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.