कारंजा/वाशिम (karanja Hospital) : कारंजा तालुक्यात (Karanja taluka) शहरासह ग्रामीण भागात गत महिनाभरात 171 जणांना मोकाट श्वांनानी चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोकाट श्वांनाची दहशत पसरली आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील लोकांचा समावेश आहे. या सर्वांनी (karanja Hospital) कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रात्री व दिवसा ठीकठिकाणी मोकाट श्वानांच्या झुंडाच्या झुंडा पहावयास मिळतात. शहरात तर अनेक ठिकाणी मोकाट श्वानांमुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यात अनेक जण जखमी देखील झाले.
कारंजा तालुक्यातील भयभीत करणारी घटना
दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात मोकाट श्वानांची दहशत पसरली असून मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता पुढे येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाच्यावतीने मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी मोहीम उघडण्यात आली होती. परंतु काही जणांनी श्वान पकडण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्याने ती मोहीम बंद करण्यात आली.मात्र, त्यानंतर मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे (karanja Hospital) शहरात व ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस मोकाट श्वानांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरात (Municipal Administration) पालिका प्रशासनाने तर ग्रामीण भागात ग्राम पंचायत प्रशासनाने मोकाट श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.