मानोरा (Karanja-Manora Assembly) : मतदार संघात सगळीकडे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सूरू झाली असुन गावागावात बैठका व प्रचार जोरात सुरू आहे. जिकडे तिकडे शहर व ग्रामीण भागात प्रचाराच्या गाड्याचा धुराळा उडत आहे. या सर्व गोष्टी सुरू असताना काहींनी आप आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देवून तर अनेकांनी पक्ष बदल केल्याने कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघात (Karanja-Manora Assembly) नवीन चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुक (Karanja-Manora Assembly) जिंकायची सोडून अनेक बंडोबा अपक्ष उमेदवार राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी गुलाबी थंडीत जोरदार प्रचार करत असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे. त्यामुळे उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील कारंजा येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत अनेकांनी भाजपा या पक्षात जाहीर प्रवेश घेतला. पक्ष बदलून भाजपात जाहीर प्रवेश करणारे नेते, पुढारी किती मतदान देणार हे पाहणे औचित्याचे आहे.