कारंजातील गौतमनगर येथील घटना
कारंजा/वाशिम (Karanja Murder Case) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ३७ वर्षीय महिलेची लोखंडी अवजार व दगडाने ठेचून (Karanja Murder Case) निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना २१ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गौतम नगर परिसरात घडली. माहितीनुसार, मृतक महिलेचे नाव मनिषा नागसेन कुंभलवार असे आहे.
चार ते पाच महिलांनी केला हल्ला
स्थानिक पंचशील नगर येथील रहिवासी चार ते पाच महिलांनी घरात घुसून तिच्यावर दगड, लोखंडी अवजार, थापडाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला (Karanja Murder Case) केला. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यामुळे नातेवाईक व नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुढील उपचारासाठी घेवून जात असताना मार्गातच जखमी महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच (Karanja City Police) कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.