चेहरा व हातावर जखमा
कारंजा/ वाशिम (Karanja Murder Case) : कारंजा मानोरा मार्गावरील अडाण नदीवरील पुलाखाली अडाण नदी पात्रात मृतदेह (Karanja Murder Case) आढळल्याची घटना मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडे 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस (Karanja Police) व मानोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना पाचारण करण्यात आले.
काही वेळाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. यावेळी (Karanja Murder Case) मृतदेहाच्या चेहऱ्यावर व हातावर जखमा असल्याचे आणि त्याचे पाय बांधून असल्याचे दिसून आले,त्यामुळे हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह मानोरा येथील (Manora Hospital) शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.