१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कारंजा (Karanja Murder case) : तालुक्यातील ग्राम शिंगणापूर येथे एका ३० वर्षीय युवकाची काठी, दगड व लाथाबुक्क्या मारून संगनमताने हत्या करण्यात आली. शिवमंगल दिगांबर भोसले असे मृतकाचे नाव आहे. ही (Karanja Murder case) घटना १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी (Karanja Rural Police) १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी शिवमंगल भोसले याचे आरोपींशी गावातील तुकाराम सरोदे यांच्या शेतात भांडण झाले होते. हा वाद तेव्हा मिटला. पण या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी याच सिवाशिनरात्रीच्या सुमारास शिवमंगल भोसले याची पत्नी हनुमान मंदिरजवळून घरी जात असताना तिला रस्त्यात अडवले व ‘ तुम्हाला दुपारी शेतात खूप माज आला होता. आता तुला व तुझ्या नातेवाईकांना हिसका दाखवतो.’ अशी धमकी देवून तिची छेडखानी केली. तसेच शिवमंगल भोसले यास गाठून त्याला लाठ्या, दगड व लाथाबुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, नातेवाईकांनी त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. पण येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Karanja Murder case) घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आला. याप्रकरणी (Karanja Rural Police) कारंजा ग्रामीण पोलिसांनी मृतकाचा भाऊ मुकेश दिगांबर भोसले (४५, रा. शिंगणापुर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद बब्बू सय्यद याकूब, सय्यद तौसीफ सय्यद बाबू, सय्यद बादशाह उर्फ आफ्रिदी सय्यद बब्बू, सय्यद अफरोज सय्यद कादीर, गन्नू अक्रम सय्यद सय्यद शाहरुख सय्यद नबी, सय्यद सलीम सय्यद बुरहान, हारून इलियास बेग, सय्यद मोनू सय्यद रहेमान (सर्व रा.शिंगणापूर), सय्यद बब्बूचा जावई (रा.कामरगाव) व इतर दोन ते तीन यांच्याविरुद्ध कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ७९, ३५१(२) , भारतीय न्यायिक संहिता २०२३, सहकलम ३(२), (व्हीए)३,(२), (व्ही ) अ.जा.ज.अ.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Karanja Murder case) घटनेचा अधिक तपास (Karanja Rural Police) उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी करीत आहे.