कारंजा शहर पोलिसांची मोठी कारवाई
कारंजा/ वाशिम (Karanja Police) : कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे वाहन (Karanja Police) कारंजा शहर पोलिसांनी 21 मे रोजी रात्रीच्या दरम्यान शहरालगतच्या सावरकर चौकात पकडल्याने 19 जनावरांना जीवदान मिळाले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील शहरालगतच्या सावरकर चौकात (Karanja Police) शहर पोलिसांनी एम एच 40 सी. एम. 0337 या आयशर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 17 म्हशी व दोन हेले असे 19 जनावरे निर्दयीपणे आखूड दोरखंडाने बांधून वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
10 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त
यावेळी (Karanja Police) पोलिसांनी ट्रकवरील ताडपत्री बाजूला करून पाहणी केली असता, 17 म्हैशी व 2 हेले (म्हैस जातीतील नर) असे एकुण 19 जनावरे अंदाजे किंमत 3 लाख 26 हजार आढळून आले. जनावरे वाहतुकी बाबत परवाना विचारला असता, त्याने पंचासमक्ष नसल्याचे सांगीतले. सदर जनावरांचा व वाहनाचा पंचासमक्ष घटनास्थळजप्ती पंचनामा करून एम. एच. 40 सि. एम. 0337 क्रमांकाचे वाहन कींमत 7 लाख रुपये व सदर वाहनामधील म्हैस जातीची जिवंत 19 जनावरे कींमत 3 लाख 26 हजार असा एकूण 10 लाख 26 हजार रुपयाचा माल ताब्यात घेवून पुढील देखभाल व ऊपचाराकरीता जप्त मालातील एकुन 19 जनावरे पांजर पोळ गौरंक्षन संस्था कारंजा येथे पाठवले व वाहन आणि नमुद आरोपी चालक मोहम्मद इरफान मोहम्मद युसुफ वय 28 वर्ष रा. कॉलसटाल मजीत मागे कामठी जि. नागपुर , मोहम्मद अशपाक मोहम्मद इब्राहीम वय 43 वर्ष रा. चौधरी मजीत जवळ भाजीमंडी कामठी जि. नागपुर , शकील कुरेशी रा. कामठी नागपुर आणि वाहन मालक (karanja Crime) यांनी संगणमत करुन कळमणा मार्केट नागपुर येथुन कतलीकरिता जनावरे खरेदी करुन जनावरांना अंत्यत क्रुर व निर्देयतेने अपुऱ्या जागेत डांबून आखूड दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाण्याची सोय न करता नमुद वाहनाचे डाल्यामध्ये कोंबुन वाहतुक करतांना मिळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, मयुरेश तिवारी, उमेश बीबेकर, गणेश जाधव, अमित भगत, नितीन व धनंजय यांनी केली.