7 लाख 30 हजारांच्या मुद्देमालासह दोन जण ताब्यात
कारंजा/ वाशिम (Karanja Police) : कारंजा शहर पोलिसांनी सापळा रचून (MD drugs) एमडी ड्रग्स पकडले. यावेळी (Karanja Police) पोलिसांनी 7 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करीत दोन जणांना ताब्यात घेतले. समीर खान बशीर खान वय 32 व सेहबाजोद्धिन अयनोद्धिन वय 20 अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून, ते मानोरा येथील रहिवासी आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम . एच 01 डी.ई.8235 क्रमांकाची बलीनो कार अमारावतीहून मानोरा कडे जात असताना कारंजा अमरावती मार्गावरील समृद्धी महामार्गाजवळ त्या कारची तपासणी केली असता, कार मध्ये 5 ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कारसह दोघा जणांना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेले (MD drugs) एमडी ड्रग्स किंमत 30 हजार व 7 लाख रुपयांची कार असा एकूण 7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई (Karanja Police) ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड ,उमेश बिबेकर व मयूर तिवारी यांच्यासह इतरांनी केली. (karanja Crime) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.