शेलुवाडा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
कारंजा/ वाशिम (karanja Police) : एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये येथील (karanja Police) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातच जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली. ही घटना २१ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (karanja Crime) करण्यात आला आहे.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील दोन्ही आरोपी एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात पोहचले होते. परंतु, याठिकाणी पोहोचतच दोघांमध्ये अचानक शाब्दिक बाचाबाची होवून त्यांनी एकमेकांना थापडाबुक्क्यांनी (karanja Crime) मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांचे भांडण सोडवले. याप्रकरणी (karanja Police) पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख अन्सार शेख सत्तार (३५) व सुधीर श्रीकृष्ण मोडक (४५, दोघेही रा.शेलुवाडा) यांच्या विरुद्ध हाणामारी करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून शांतता भंग केल्याबद्दल कलम १९४ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे करीत आहेत.