पत्नीची ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार
कारंजा/वाशिम (Karanja suicide) : घरामागे असलेल्या खुल्या जागेच्या वादातून पतीला आरोपीने मारहाण केली. तसेच या जागेवरून आरोपीसोबत नेहमी वाद होत असल्याने या त्रासाला कंटाळून पतीने विष प्राशन (Husband suicide) करून आत्महत्या केली, अशी तक्रार तालुक्यातील गिर्डा येथील एका पत्नीने दिली. त्यावरून स्थानिक (Karanja police) ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ७ ऑगस्ट रोजी एका जणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्नी अर्चना दत्तू राठोड (३५, रा.गिर्डा) हिने तक्रारीत म्हटले की, ती राहत असलेल्या घराच्या मागे आरोपीचे शेत असून तिचे घर आणि आरोपीच्या शेताच्या मधात खुली जागा आहे. या जागेवर आरोपीने तारेचे कुंपण केले. त्यावरून ६ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या पतीला आरोपीने शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली.
या (Husband suicide) प्रकारामुळे व नेहमीच्या जागेच्या वादाला कंटाळून फिर्यादीचा पती दत्तू देविदास राठोड ( ४०, रा.गिर्डा) यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ७ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून (Karanja police) पोलिसांनी आरोपी संजय मोतीराम राठोड (५१,रा.गिर्डा) याच्याविरुद्ध कलम १०८ बी.एन.एस. नुसार आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.