जनुना येथील घटना
कारंजा/वाशिम (Karanja Woman Death) : नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने तालुक्यातील जनुना येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. शोभाबाई परसराम चौधरी असे (Woman Death) मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभाबाई चौधरी ह्या शेतमजुरीचे काम करायच्या. मंगळवारी त्या गावातील पोलीस पाटील जानराव राठोड यांच्या शेतात निंदणाच्या कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान, जनुना येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे काम आटोपते घेवून त्या इतर महिलांसह घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु, या पावसामुळे गावालगतच्या नाल्याला पूर आला होता. दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने इतर महिलांनी हा नाला सुखरूप ओलांडला. परंतु, शोभाबाई यांचा तोल गेल्याने त्या नाल्यात पडल्या व (Woman Death) वाहत्या पाण्यासोबत वाहून गेल्या.
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. अखेर गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर वाहणाऱ्या याच नाल्यात त्या आढळून आल्या. कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी लगेच येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु येथे डॉ.सागर मस्के यांनी त्यांना तपासून (Woman Death) मृत घोषित केले.