खमारी/बुटी (Bhandara Accident) : भंडारा शहराजवळील महामार्गावरील कारधा चौक (Bhandara Accident) अपघातप्रवणस्थळ ठरत आहे. आज सकाळी ९ वाजतादरम्यान भंडार्याकडे येणार्या ट्रकने कारधाकडे जाणार्या दुचाकीस चिरडले. त्यात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. संपत गोविंदा भोयर (६८) रा.कारधा, असे मृतकाचे नाव आहे.
कारधा येथील सेवानिवृत्त कर्मचारी संपत भोयर हे काही कामानिमित्त दुचाकी क्र.एमएच ३५ ई ७६०३ या गाडीने पालगावकडे गेले होते. काम आटोपून स्वागावाकडे जात असतांना कारधा चौकात लाखनीकडून भंडार्याकडे जाणारा ट्रक क्र.सीजी ०४ एमपी ९४९६ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळीपणे चालवून दुचाकीला चिरडले. यात दुचाकीस्वार संपत भोयर ट्रकखाली येऊन जागीच गतप्राण झाले. सदर (Bhandara Accident) अपघात रस्ता ओलांडतांना झाला. घटनेची माहिती होताच कारधाचे पोउपनि सुदाम कांबळे, वाहतूक पोहवा दिलीप धावडे, पोहवा त्र्यंबक गायधने, पोशि रजनीकांत मुरकूटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. मृतक याचे पश्चात पत्नी, एक मुलगी, असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद कारधा पोलीसात केली असून पुढील तपास ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि सुदाम कांबळे करीत आहेत.