कारेगाव, चोप/गडचिरोली (Karegaon Heavy Rain) : जिल्ह्यात व दसाईगंज तालुक्यात गेल्या 24 तासापासून (Heavy Rain) पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात व विशेषत: देसाईगंज तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. आता ध धान पीक फुटणीला सुरुवात होण्याची वेळ आली तर काही शेतकऱ्यांचे हलक्या प्रजातीचे धानपिक फुटनिला आलेले आहे तर,मध्येम व भारी ( जड ) प्रजातीचे धानपिके काडीत,गरबा त, फुटनीच्या तयारीत आहेत, तर बऱ्याच्या शेतकयांचे निदंनाचे कामे चालू आहेत,अशावेळी धानपिकाला जास्त पाण्याची अत्यंत आवशकता असते. (Heavy Rain) पाण्याशिवाय निंदन काढता येत नसल्याने व पाऊस पडत नसल्याने कोरडवाहू शेतकन्यांना बर्याच अडचनिंना सामोरे जावे लागले लांब दुरवरूनपाण्याची सोय केली तर काहीनी डिजल इंजिनचा वापर करून निंदनाच्या कामाला सुरवात केली.
अशातच काल पासुन अचानक रात्रन दिवस पावसाने हजेरी (Heavy Rain) लावल्याने शेतपिकांत पाणी साचल्याने फुटनिवर आलेल्या धान पिकांची फारमोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. निसवनी झालेल्या हलक्या प्रजातीच्या धानपिकांच्या लोंबी वरील लव पाण्यामुळे वाहून गेल्याने धानपिक ( पाणफोल ) धानपिक योग्य त्या पद्धतीत भरत नसल्याने व पूराची गाळ पिकावर बसल्याने,धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे. तर बऱ्याचशा शेतकयांचे अजुन ई पिक होणे बाकीआहे. आणी I5 सप्टेंबर पर्यंत खरीप हंगामाची ई पिक पाहनी करण्याची शेवटची तारीख असलयाने बरेचशा शेतकयांचे ई .पिक. पहानी होने असल्याने ई पिक पाहनीची मदत वाढवली जावी असी मागनी शेतक्या न कडून होत आहे.
तर अचानक सतत झालेल्या पावसामुळे अनेक रस्तेही बंद पडलेत. तालूक्यातील शंकरपूर,चोप, कोरेगाव रस्त्यावरील वाहतूक चोप नाल्यावर पाणी चढल्याने रस्ता बाधीत झाला होता शेतातील निंदन व इतर कामेही बंद पडलेत. एकंदरीत गेल्या 24 तासात झालेल्या (Heavy Rain) पावसामुळे शेतकरी सोबतच सर्वसामान्य जनताही अडचणीतआली, जर शेतातील पाण्याचा निचरा लवकर झाला नाही तर, धानपिकांनवर गाळ साचुन पिके सडण्याची सक्यता असुन नदी,नाल्यातील प्रवाहामुळे हातात येणारे पिकेही खरडून जान्याची सक्यता आहे. पूराचे पाणी ओसरल्या नंतर झालेली नुकसान कळेल, सतत पाऊस पडला तरी सुदैवाने कुठल्याही घरांची पडझड वा जिवितहानी झाली नाही.